Oats Chilla Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि चविष्ट ओट्स चिल्ला; वजन कमी करण्यासाठी ट्राय करा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

ओट्स चिल्ला का खावा?

ओट्समध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Oats Chilla Recipe

लागणारे साहित्य

ओट्स पावडर, बेसन, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेले गाजर, हळद, तिखट, जिरे, मीठ आणि पाणी.

Oats Chilla Recipe

पीठ कसे तयार करावे?

सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. गाठी न राहता मध्यम घट्टसर पीठ तयार करून १० मिनिटे झाकून ठेवावे.

Oats Chilla Recipe | yandex

चिल्ला बनवण्याची पद्धत

गरम तव्यावर थोडे तेल लावून तयार पीठ गोल आकारात पसरावे. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.

Oats Chilla Recipe

कोणत्या चटणीसोबत खावे?

ओट्स चिल्ला हिरवी चटणी, दही, टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाल्ल्यास अधिक चविष्ट लागतो.

Oats Chilla Recipe

आरोग्यासाठी फायदेशीर

ही रेसिपी कमी तेलात तयार होते. फायबर आणि प्रोटीनमुळे पचन सुधारते, ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.

Oats Chilla Recipe | Saam tv

हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय

सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी ओट्स चिल्ला हा झटपट तयार होणारा, पौष्टिक आणि चवदार पर्याय आहे.

Paneer Chilla Recipe

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

Weight Gain | AI
येथे क्लिक करा