Shruti Vilas Kadam
वजन वाढवायचं असेल तर फक्त जंक फूड खाण्याऐवजी प्रथिने, चांगले फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वांनी भरपूर संतुलित आहार घ्यावा.
अंडी, दूध, पनीर, डाळी, कडधान्ये, सोयाबीन, चिकन किंवा मासे यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ स्नायूंची वाढ करण्यास मदत करतात.
दिवसातून तीन मोठ्या जेवणांऐवजी ५ ते ६ वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात पौष्टिक अन्न खाल्ल्यास शरीराला अधिक ऊर्जा आणि पोषण मिळते.
वजन वाढवण्यासाठी फक्त खाणं पुरेसं नसून नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वजन उचलण्याचे व्यायाम केल्याने स्नायूंची वाढ होते आणि शरीर सुदृढ बनते.
शरीराच्या पुनर्बांधणीसाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. योग्य विश्रांतीमुळे स्नायूंची वाढ चांगली होते.
वजन वाढवण्यासाठी तेलकट, साखरयुक्त किंवा फास्ट फूडचा आधार घेऊ नये. त्यामुळे चरबी वाढू शकते, पण शरीर निरोगी राहत नाही.
भरपूर खाऊनही वजन वाढत नसेल किंवा अचानक वजन कमी होत असेल, तर त्यामागे वैद्यकीय कारण असू शकते. अशावेळी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.