Shreya Maskar
ओट्स भेळ बनवण्यासाठी ओट्स, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, लिंबू, मखाना, मुरमुरे, फरसाण, कोथिंबीर, मीठ आणि चिंच गुळाची चटणी इत्यादी साहित्य लागते.
ओट्स भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये ओट्स, कुरमुरे आणि मखाना भाजून घ्या.
एका बाऊलमध्ये भाजून घेतलेले ओट्स, मखाना आणि मुरमुरे टाकून मिक्स करा.
नंतर या मिश्रणात फरसाण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून एकत्र करा.
या मिश्रणात चिंच गुळाची चटणी, मीठ टाकून एकजीव करून घ्या.
सगळ्यात शेवटी या भेळमध्ये कोथिंबीर, चाट मसाला आणि लिंबाचा रस टाकून पुन्हा मिक्स करून घ्या.
अशाप्रकारे झटपट ओट्स भेळ तयार झाली.
संध्याकाळ आणि सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.