Shreya Maskar
ओट्स स्मूदी बनवण्यासाठी काजू , ओट्स, सफरचंद, खजूर, पीनट बटर, बदाम, दालचिनी पावडर, प्रोटीन पावडर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
ओट्स स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम ओट्स, काजू आणि बदाम पाण्यात भिजवा.
सफरचंद स्वच्छ धुवून कापून घ्या.
आता ब्लेंडरमध्ये सफरचंदाचे तुकडे, भिजवलेले ओट्स-काजू-बदाम आणि खजूर घालून ब्लेंड करून घ्या.
या मिश्रणात पीनट बटर आणि दालचिनी पावडर घालून पुन्हा एकदा ब्लेंड करा.
आता हे मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये काढून त्यात थोडी पाणी आणि प्रोटीन पावडर टाकू मिक्स करा.
ओट्स स्मूदीला काजू, बदाम आणि सफरचंदाने सजवा.
नियमित सकाळच्या नाश्त्याला ही पौष्टिक ओट्स स्मूदी प्यायल्याने तुमचे वजन नक्कीच वाढेल.