Manasvi Choudhary
अंकशास्त्रानुसार, जीवनात अंकाना विशेष महत्व आहे. ते तुमच्या जीवनाशी संबंधित महत्वाचे मानले जातात. 0 ते 9 हे अंक एखाद्या व्यक्तीचे नशीब, संधी आणि भविष्य याविषयी सांगते. अंकशास्त्रानुसार, 0 ते 9 यामधील अंक सुख- समृद्धीवर प्रभाव पाडू शकतात.
निळ्या, लाल आणि हिरव्या कोणत्याही एका पेनने तुमच्या हातावर 2190 हे अकं लिहा. दिवसातून अनेकवेळा त्याकडे पाहा आणि वाचा.
अंकशास्त्रानुसार, अंक २ चंद्राशी संबंधित आहे.. चंद्र हा भावनांवर नियंत्रण ठेवतो. जीवनात स्थिरता आणण्यासाठी आणि मन शांत व तल्लख ठेवण्यासाठी मदत करतो.
सूर्य हा अंक 1 चा स्वामी आहे. कुंडलीत किंवा अंकशास्त्रानुसार सूर्य बळकट असल्यास व्यक्तीला समाजात मान-सन्मान, उच्च पद आणि प्रसिद्धी मिळते. मन मजबूत करण्यासाठी हा अंक फायदेशीर ठरतो.
अंक 9 हा ग्रहांचा सेनापती आणि ऊर्जेचे प्रतीक असणाऱ्या मंगळ ग्रहाशी जोडलेला आहे. जर मंगळ शक्तिशाली असेल, तर व्यक्तीच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळते.
2190 याची बेरीज 12 होते आणि या 2 अंकाची बेरीज 3 होते. या अंकाचा स्वामी राहू मानला जातो. ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.