Saam Tv
तुम्ही तुमच्या शहरामध्ये काही मुलांना रस्त्यावर पथनाट्य करताना एकदा तरी पाहिलेच असेल.
पथनाट्याची सुरुवात कशी झाली? याबद्दल थोडक्यात आपण जाणून घ्या.
पथनाट्य म्हणजे जे नाटक रस्त्यावर काही मुलांच्या समुहाने साजरे केले जाते.
पथनाट्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा सगळ्या प्रकारचे पाहायला मिळते.
नाटकाची सुरुवात प्राचीन काळापासून होत गेली. अजूनही लोक बऱ्याच भाषांमध्ये विविध शैलीत नाटक करत आहेत.
पुर्वी आदिवासी लोक शिकारी केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस गोल करून खात खात नाच-गाणे करायचे.
तेव्हा लोक दिवसभर घडलेल्या घटनांवर नाटक करायचे. आजही आंध्रप्रदेशात लोकनाट्य परंपरेचा 'विथि नाटकम' हा प्रकार मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.