November Travel: नोव्हेंबरमध्ये ट्रॅव्हल प्लॅन करताय? फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत 'या' सुंदर रोमँटिक ठिकाणी करा ट्रिप

Dhanshri Shintre

ट्रिप

ट्रीपला जाण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतं. पण योग्य प्लॅनिंग, बजेट आणि वेळ मिळाला तरच ती ट्रिप अविस्मरणीय होते.

नोव्हेंबर महिना

नोव्हेंबर महिना प्रवासासाठी उत्तम मानला जातो. या काळात हवामान आनंददायी असल्याने अनेक सुंदर पर्यटन स्थळं भेट देता येतात.

उदयपूर

उदयपूरमध्ये सिटी पॅलेसची भव्यता पाहा आणि पिचोला तलावावर रोमँटिक बोटिंगचा अनुभव घ्या, प्रवास अविस्मरणीय बनेल.

सूर्यास्त

उदयपूरची रंगीबेरंगी बाजारपेठ, ऐतिहासिक शाही वैभव आणि पिचोला तलावावरील मोहक सूर्यास्त प्रवाशांना खास अनुभव देतात.

गोवा

गोव्यातील कलंगुट, बागा आणि अंजुना बीचवर फिरत समुद्राच्या लाटांसोबत रिलॅक्स व्हा, बीचफूड आणि नाईटलाइफचा आनंद घ्या.

अलेप्पी आणि मुन्नार

अलेप्पीच्या शांत बॅकवॉटरमध्ये हाउसबोट ट्रिपचा अनुभव घ्या, तसेच मुन्नारच्या हिरवाईत फिरत निसर्गसौंदर्याचा आनंद लुटा.

केरळ

केरळमध्ये प्रवास करताना पेरियार नॅशनल पार्कला नक्की भेट द्या; येथे वन्यजीव निरीक्षण आणि निसर्गरम्य दृश्यांचा भरपूर आनंद घेऊ शकता.

NEXT: गर्दीपासून सुटका हवीये? पर्यटकांना भुरळ घालणारे ८ सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारे, एकदा भेट द्याच

येथे क्लिक करा