Beach Travel: गर्दीपासून सुटका हवीये? पर्यटकांना भुरळ घालणारे ८ सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारे, एकदा भेट द्याच

Dhanshri Shintre

सुंदर समुद्रकिनारे

भारतामध्ये स्वच्छ, शांत आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. पाणी, स्वच्छ वाळू आणि नैसर्गिक वातावरण यामुळे ते पर्यटकांना आकर्षित करतात.

निसर्गसौंदर्याचा अनुभव

स्वच्छता आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले हे समुद्रकिनारे गोंधळापासून दूर विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी उत्तम ठिकाण मानले जातात. शांत सुट्टी आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव येथे मिळतो.

पाडुबिद्री बीच, कर्नाटक

स्वच्छ वाळू आणि शांत निळे पाणी यासाठी प्रसिद्ध पाडुबिद्री बीच निसर्गसौंदर्य आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा सुंदर अनुभव देतो.

राधानगर बीच, अंदमान आणि निकोबार बेटे

भारतातील सर्वात मोहक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जाणारा राधानगर बीच, निळ्या स्वच्छ पाण्यासाठी आणि अप्रतिम सूर्यास्तासाठी(Sunset) खास ओळखला जातो.

शिवराजपूर बीच, गुजरात

गुजरातच्या किनारपट्टीवरील शांत आणि सुंदर शिवराजपूर बीच, स्वच्छ निळे पाणी आणि मनोहारी वाळूच्या किनाऱ्यासाठी विशेष ओळखला जातो.

घोघला बीच, दमण आणि दीव

सोनेरी वाळू, शांत लाटा आणि सुखद वातावरणामुळे घोघला बीच पर्यटकांना खास आकर्षित करतो आणि शांत विश्रांतीसाठी उत्तम ठरतो.

ऋषिकॉंडा बीच, आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशातील ऋषिकोंडा बीच मनमोहक निसर्ग आणि साहसाचा समतोल अनुभव देतो. शांत वातावरण आणि रोमांचक जलक्रिडांसाठी प्रसिद्ध आहे.

कासारकोड बीच, कर्नाटक

स्वच्छ पाणी आणि शांत वातावरणामुळे कासारकोड बीच निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण ठरते. तुम्हाला शांत किनारी सुट्टीचा आनंद घेता येईल.

गोल्डन बीच, ओडिशा

उत्कृष्ट स्वच्छता आणि सुरक्षिततेमुळे हा किनारा शांतता आवडणाऱ्या करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमध्ये मानला जातो.

कप्पड बीच, केरळ

कप्पड बीचचे स्वच्छ वातावरण आणि शांत समुद्री हवा, मन:शांती आणि निवांत वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास बनवतात.

NEXT: पृथ्वीवरील स्वर्ग! वर्षभर पडतो पाऊस; हिरवळ, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचे खजिना पाहून तुम्हीही व्हाल थक्क

येथे क्लिक करा