Heart Attack Risk: कोलेस्ट्रॉल आणि बीपी नॉर्मल असतानाही येतोय हार्ट अटॅक! डॉक्टर म्हणाले, आधी तपासा 'ही' १ गोष्ट

Manasvi Choudhary

हृदयविकाराच्या झटका

सध्या दिवसेंदिवस हृदयविकाराच्या झटका येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. केवळ वृद्धानाच नाही तर तरूणांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे.

Heart Attack Risk

हृदयविकाराच्या झटका येण्याचे कारण

उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचे मुख्य कारण मानले जाते. परंतु, अनेकांना रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नसूनही अनेक अचानक हृदयविकाराचा झटका येतो.

Heart Attack Risk

लायपोप्रोटीन गंभीर समस्या

वैद्यकीय माहितीनुसार, अनेकदा खराब कोलेस्ट्रॉलला (LDL) हृदयविकाराचे मुख्य कारण मानले जाते. परंतु, रक्तातील विशिष्ट प्रकारच्या लायपोप्रोटीनची पातळी त्याहूनही अधिक घातक ठरू शकते.

Lp a heart attack risk | PINTREST

लायपोप्रोटीन (a) म्हणजे काय?

लायपोप्रोटीन (a) हा रक्तातील असा एक विशिष्ट प्रकारचा प्रथिन आणि चरबीयुक्त घटक आहे, जो दिसायला सामान्य 'बॅड कोलेस्ट्रॉल' (LDL) सारखाच असतो. परंतु, याच्या संरचनेत एक विशिष्ट प्रथिन जोडलेले असते, ज्यामुळे हा घटक सामान्य कोलेस्ट्रॉलपेक्षा अत्यंत घातक असतो.

hidden heart attack causes | PINTREST

लायपोप्रोटीन घातक का आहे?

लायपोप्रोटीन हा चिकट असल्यामुळे हृदयाला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्यांच्या भिंतींवर सहजरीत्या साचतो आणि प्लॉक निर्माण करतो ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात आणि हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा झटका येतो.

heart attack reasons | Google

अनुवंशिकतेवर आधारित

लायपोप्रोटीनची पातळी मुख्यत्वे अनुवंशिकतेवर अवलंबून असते. जर तुमच्या कुटुंबात किंवा कोणाला हृदयविकाराचा झटका आला असेल, तर तुमच्यामध्ये लायपोप्रोटीन Lp(a) पातळी जास्त असण्याची शक्यता असू शकते.

genetic risk factor for heart disease | PINTEREST

NEXT: Cumin Water Benefits: जेवणाआधी की जेवणानंतर, जिऱ्याचे पाणी कधी प्यावे?

Cumin Water Benefits
येथे क्लिक करा...