Manasvi Choudhary
श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात आहारात विशेष काळजी घेतली जाते.
श्रावणात फक्त नॉनव्हेजच नाही तर काही भाज्या खाणे टाळतात. त्या भाज्या कोणत्या हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
श्रावणात पालक, मेथी, शेपू या पालेभाज्या खाणे टाळतात. पावसाळ्यात पनचक्रिया मंदावलेली असते अशावेळी तुम्हाला पोटाचे विकार होऊ नये म्हणून या भाज्या खाणे टाळले जाते.
श्रावणात वांगी खाणे टाळले जाते. यामागे अनेक धार्मिक कारणे आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या वांगी खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ नये ही मान्यता आहे.
श्रावणात कांदा- लसूण खाणे टाळले जाते. कांदा आणि लसणाला तामसिक प्रवृत्तीचे मानले जाते, ज्यामुळे मन आणि शरीरात उष्णता व अस्वस्थता वाढू शकते.
श्रावणात मुळा खाणे टाळले जाते यामागचे कारण म्हणजे मुळा पचायला जड असतो यामुळे मुळा खाल्ल्याने पोटात गॅस, वात, जळजळ होऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.