Manasvi Choudhary
जगातील सर्वात जुने फळ कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हीदेखील केळी आणि सफरचंद म्हणाल.
परंतू तुम्हाला माहितीये का? केळी आणि सफरचंद हे जगातील जुने फळ नाही.
जगातील सर्वात जुने फळ म्हणजे अंजीर. साधारण 11,400 वर्षापूर्वी मानवाने सर्वातआधी अंजीर या फळाची लागवड केली होती.
इस्त्रायलच्या जॉर्डन खोऱ्यात शास्त्रज्ञांना वाळलेली अंजीरं सापडली तेव्हापासून अंजीराची लागवड करण्यात आली.
अंजिराचे झाड खूप वेगाने वाढते. अंजीरच्या झाडाला वर्षातून २-३ वेळा फळे येतात.
अंजीर चवीला गोड आणि पौष्टिक असतात. ताजे असताना अंजीर जितके चवदार लागते, तितकेच ते वाळवून तुम्ही वर्षभर खाऊ शकता. अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम, आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
याशिवाय खजूर, केळी, डाळिंब आणि द्राक्षे यांसारखी फळे देखील खुप जुनी असली तरी सर्वातआधी अंजीरची लागवड केलेले फळ मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.