Shreya Maskar
आजच्या जगात लोक अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच इंटरनेट शिवाय देखील राहू शकत नाही.
जेथे संपूर्ण दुनिया एका बोटावर आली आहे, तिथे जगातील एका देशात इंटरनेटचा वापर फारच कमी होताना पाहायला मिळत आहे.
उत्तर कोरियामध्ये इंटरनेटचा वापर मर्यादित स्वरूपात केला जातो.
बाहेरच्या जगाशी लोकांनी जास्त कनेक्ट होऊ नये, यासाठी इंटरनेटचा वापर कमी होतो.
उत्तर कोरियाची लोक स्थानिक इंटरनेट वापरतात.
स्थानिक इंटरनेट मध्ये सरकार मान्यता प्राप्त वेबसाइटची माहिती मिळते.
शासन व्यवस्था कमकुवत होऊ नये म्हणून असा नियम येथे बनवण्यात आला आहे.
उत्तर कोरियातील लोकांना जगात घडणाऱ्या अनेक गोष्ट माहिती नसतात. किंवा खूप उशीरा समजतात.