Surabhi Jayashree Jagdish
हिमोग्लोबिन हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जो रक्तामधून ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. वय, लिंग आणि शारीरिक स्थितीनुसार हिमोग्लोबिनची योग्य पातळी वेगवेगळी असते. वयोमानानुसार तुमचं हिमोग्लोबिन किती असलं पाहिजे ते पाहूयात.
नवजात बाळांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी साधारणपणे १६ ते २० ग्रॅम/डिसिलिटर इतकी असते. जन्मानंतर काही आठवड्यांत ही पातळी हळूहळू कमी होऊ शकते. हे नैसर्गिक बदल असून बाळाच्या शरीराच्या जुळवून घेण्याचा भाग आहे.
या वयोगटातील मुलांमध्ये हिमोग्लोबिन साधारणपणे १०.५ ते १३.५ ग्रॅम/डिसिलिटर असणं योग्य मानलं जातं. या काळात पोषण खूप महत्त्वाचं असतं, कारण शरीराची वाढ जलद होत असते.
६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हिमोग्लोबिन ११.५ ते १५.५ ग्रॅम/डिसिलिटर असणं सामान्य आहे. या वयात शारीरिक आणि मानसिक विकास वेगाने होतो. संतुलित आहारामुळे योग्य पातळी टिकवून ठेवता येते.
किशोरवयीन मुलांमध्ये हिमोग्लोबिन साधारणपणे १३ ते १६ ग्रॅम/डिसिलिटर असतं. किशोरवयीन मुलींमध्ये हे प्रमाण १२ ते १५ ग्रॅम/डिसिलिटर इतकं असतं. हार्मोनल बदल आणि मासिक पाळीमुळे मुलींमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता जास्त असते.
प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन १३.५ ते १७.५ ग्रॅम/डिसिलिटर असणं सामान्य मानलं जातं. ही पातळी शरीराच्या ऑक्सिजन वहन क्षमतेसाठी आवश्यक असते. कमी पातळी असल्यास थकवा, श्वास लागणं आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
प्रौढ महिलांमध्ये हिमोग्लोबिन १२ ते १५.५ ग्रॅम/डिसिलिटर असणं योग्य असतं. मासिक पाळी, गर्भधारणा यांसारख्या कारणांमुळे महिलांमध्ये पातळी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित तपासणी आणि पोषणयुक्त आहार खूप गरजेचा असतो.