Manasvi Choudhary
जेव्हा आपण कोणताही आवडता पदार्थ खातो, तेव्हा आपण केवळ त्याची चव पाहतो. मात्र, तो पदार्थ कशासोबत खावा आणि कशासोबत खाऊ नये याकडे लक्ष देत नाही.
आयुर्वेदानुसार , पदार्थांचे चुकीचे कॉम्बिनेशन शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
अनेकदा नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात.
पोटफुगी, पोट जड होणे, आंबट ढेकर येणे, गॅस होणे या समस्या पदार्थाच्या चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे होते.
वारंवार नॉनव्हेज खाल्ल्यनंतर तुम्हाला पोटाचा त्रास होत असेल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे हे लक्षात घ्या.
नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दूध, दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाणे टाळा.
एकाचवेळी अनेक प्रकारचे मासे एकत्र खाऊ नका पचायला जड जाते.
नॉनव्हेज खाल्ल्यानंतर लिंबू, संत्री, टरबूज, द्राक्षे ही फळे खाणे टाळावे.
अनेकांना नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक प्यायची सवय असते मात्र ही सवय टाळा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.