Shruti Vilas Kadam
२०२५ सालचा नोबेल पुरस्कार मेरी ई. ब्रुनको, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन साकागुची या तीन वैज्ञानिकांना मिळाला आहे. त्यांना हा सन्मान "इम्यून टॉलरन्स" (Immune Tolerance) या क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी देण्यात आला आहे. या संशोधनामुळे मानवी रोगप्रतिकारक शक्ती शरीरात स्वतःच्याच पेशींवर हल्ला का करत नाही, हे समजण्यास मदत झाली आहे.
भारतात आतापर्यंत अनेक भारतीयांनी नोबेल पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात रवींद्रनाथ टागोर (साहित्य), सी.व्ही. रमण (भौतिकशास्त्र), मदर तेरेसा (शांतता) यांचा समावेश आहे.
रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील अमुलाग्र योगदानासाठी नोबेल पारितोषिक मिळले ते नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरले.
भौतिकशास्त्रातील 'रमण इफेक्ट' या शोधासाठी सी.व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक मिळाला.
मदर तेरेसा यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळाला होता.
हर गोविंद खोराना यांना वैद्यकशास्त्रातील जनुकीय अनुक्रमावर केलेल्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाला.
अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाला.
वेंकटरामन रामकृष्णन यांना रसायनशास्त्रातील राइबोसोमच्या कार्याचे संशोधन करण्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाला.
कैलाश सत्यार्थी यांना शांततेसाठी आणि बालहक्कांसाठी केलेल्या कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाला.
अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांसाठी नोबेल पारितोषिक मिळाला आहे.