Surabhi Jayashree Jagdish
उत्तर प्रदेशातील रामपूर संस्थानाच्या नवाबांची जीवनशैली त्यांच्या भव्यतेसाठी जगभर ओळखली जात होती. नवाब हमीद अली खान यांच्या कारकिर्दीत, रामपूरची भव्यता इतकी होती की त्यांच्या खास बाग या महालातच रेल्वे रुळ टाकण्यात आले होते.
नवाब हमीद अली खान यांना प्रवासासाठी गाडी किंवा घोडागाडीची गरज नव्हती. याचं कारण म्हणजे रेल्वे थेट त्यांच्या दिवाणखान्याजवळील खाजगी स्थानकावर येत असे. हे त्या काळातील इंजिनियरींग आणि शाही वैभवाचं एक उदाहरण होतं.
रामपूरचे नववे नवाब, हमीद अली खान यांनी स्वतःच्या सोयी लक्षात घेऊन आपल्या महालातच एक संपूर्ण रेल्वे स्टेशन बांधलं होतं. हे स्टेशन आणि रेल्वे लाईन बांधण्याचा खर्च आजच्या हिशोबाने अंदाजे ११३ कोटी रुपये आहे.
मुख्य रेल्वे लाईनवर पोहोचण्यासाठी आपल्याला महालाबाहेर जावं लागू नये, याची नवाबांनी काळजी घेतली होती, म्हणूनच मिलाक ते रामपूरपर्यंत सुमारे ४० किलोमीटर लांबीची एक स्वतंत्र रेल्वे लाईन टाकण्यात आली होती.
ही रेल्वे लाईन त्यांच्या महालाला थेट मुख्य रेल्वेला जोडत होती. जेव्हा कधी नवाब प्रवासाला निघत किंवा प्रवासावरून परत येत, तेव्हा रेल्वे थेट महालाच्या आवारात प्रवेश करत असे. हा विशेषाधिकार त्या काळातील कोणत्याही भारतीय राजा किंवा नवाबासाठी एक विशेष हक्क मानला जात असे.
१९२५ मध्ये, नवाबांनी स्वतःसाठी 'द सलून' नावाची एक विशेष शाही रेल्वे बांधून घेतली. ही रेल्वे केवळ एक लोखंडी डबा नसून रुळांवर धावणारा एक चालता फिरता राजवाडाच होता. त्याच्या आत एक आलिशान शयनकक्ष, भोजन कक्ष आणि किचन होतं.
१९ जून १९३० रोजी नवाब हमीद अली खान यांच्या निधनानंतर रामपूर संस्थानाची सूत्रं त्यांचे पुत्र नवाब रझा अली खान यांच्याकडे आली. रझा अली खान यांनी केवळ आपल्या वडिलांचा शाही वारसाच पुढे चालवला नाही तर मानवतावादी मूल्यांनाही प्राधान्य दिलं.
१९४७ मध्ये जेव्हा देशाची फाळणी झाली आणि जातीय तणाव वाढला, तेव्हा नवाब रझा अली खान यांनी पीडित लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी या खाजगी शाही रेल्वेगाडीचा वापर केला.