Shreya Maskar
गुजरात मधील एकाही गावातल्या घरात स्वयंपाकघर नाही.
घरात कोणाचाही अन्न शिजवले जात नाही. म्हणजेच या गावामध्ये सर्वांसाठी एकच अन्न बनवले जाते.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील चंदनकी गावात ही अनोखी प्रथा आहे.
या गावात सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण गावातील एकाच मोठ्या स्वयंपाक घरात तयार केले जाते.
कोणाच्याही घरी पाहुणे आले तरी देखील त्यांचे जेवण येथे होते.
या गावात जेवणाच्या पंगतमध्ये आधी महिला बसतात आणि मगच पुरुष जेवतात.
गावात मोठे सार्वजनिक भोजनकक्ष आहे.
चंदनकी गाव स्वच्छतेसाठी ओळखले जाते.