Surabhi Jayashree Jagdish
डॅशबोर्ड साफ करण्यापूर्वी त्यावर ठेवलेल्या अनावश्यक वस्तू काढून घ्या. यामध्ये नाणी, चष्मा, चार्जर किंवा इतर लहान वस्तूंचा समावेश असू शकतो. या वस्तू बाजूला ठेवल्यामुळे डॅशबोर्डचा प्रत्येक भाग व्यवस्थित स्वच्छ करता येतो.
एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये कार वॉश शॅम्पूचे काही थेंब टाकून चांगले मिसळा. या मिश्रणाचा वापर डॅशबोर्डवरील चिकटलेली घाण आंणि डाग साफ करण्यासाठी करता येतो.
एक स्वच्छ मायक्रोफायबर कापड घ्या आणि ते शॅम्पूच्या पाण्यात बुडवा. त्यानंतर कापड चांगले पिळून घ्या. कापड फक्त थोडे ओलसर राहील याची काळजी घ्या.
आता या ओलसर कापडाने संपूर्ण डॅशबोर्ड हलक्या हाताने पुसून घ्या. असं केल्याने डॅशबोर्डवर चिकटलेली माती आणि धूळ साफ होण्यास मदत होते. डाग असलेल्या ठिकाणीही कापडाने हलक्या हाताने स्वच्छता करा.
डॅशबोर्डची स्वच्छता सुरू करताना आधी कोरड्या मायक्रोफायबर कापडाचा वापर करा. यामुळे डॅशबोर्डवर साचलेली मोकळी धूळ सहज निघून जाते. त्यानंतर ओलसर कापडाने पुढील स्वच्छता करणं सोपं जातं.
डॅशबोर्डच्या कोपऱ्यांमध्ये आणि अरुंद जागांमध्ये धूळ साचलेली असू शकते. अशा ठिकाणची धूळ काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरच्या सॉफ्ट ब्रशचा वापर करा. ब्रशच्या मदतीने या जागा सहज स्वच्छ करता येतात.
तुमची कार नेहमी नवीन दिसावी असं वाटत असेल तर डॅशबोर्डची नियमित स्वच्छता करणं आवश्यक आहे. योग्य पद्धतीने साफसफाई केल्यास डॅशबोर्डवरील धूळ आणि घाण कमी प्रमाणात जमा होते.