Surabhi Jayashree Jagdish
अनेकदा आपल्याला घरी बनवलेली बिरीयानी खावीशी वाटते. मात्र बिरीयानीचा मसाला उपलब्ध नसल्याने आपला हिरमोड होतो.
घरी बनवलेला बिर्याणी मसाला केवळ स्वादिष्टच नाही तर शुद्ध, ताजा आणि आपल्या चवीनुसार बदलता येतो.
धणे- 3 टेबलस्पून, जिरे- 2 टेबलस्पून, दालचिनी (2-3 इंच तुकडे) 3-4, लवंग 10-12, हिरवी वेलदोडे 8-10, काळी मिरी 1 टेबलस्पून, मोठी वेलदोडी 2, जायपत्री 2-3 तुकडे, दगडफूल (Stone Flower) 1 चमचा (ऐच्छिक), तेजपान2 पाने, नागकेशर / मिरीफुल (ऐच्छिक) 4-5, सुंठ 1 इंच तुकडा (कोरडा), काळं जिरे (शाही जिरे)1 चमचा, मुस्कट पूड (Nutmeg Powder) ¼ चमचा
सर्व मसाले स्वच्छ कोरडे पुसून घ्या. त्यानंतर 2-3 मिनिटं, फक्त सुगंध येईपर्यंत. सतत ढवळत रहा, जळू देऊ नका.
हे सर्व मसाले थंड होऊ द्या
अगदी बारीक आणि गंधित पूड मिळेपर्यंत मिक्सरमध्ये फिरवा. हवाबंद डब्यात ठेवल्यास 2-3 महिने टिकतो.
1 किलो बिर्याणीला साधारणपणे 2 ते 2½ टेबलस्पून मसाला वापरावा.