Manasvi Choudhary
आवळा औषधी गुणधर्मासाठी ओळखला जातो. व्हिटॅमिन सी, आयन आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त आवळा केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
केसांच्या वाढीसाठी, कोंडा कमी करण्यासाठी आणि केस पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता.
फार पूर्वी पासून आवळ्याचा वापर केसांसाठी होतो. यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा तुम्ही आवळ्याचा नैसर्गिक उपाय करू शकता.
आवळ्याचा रस तुम्ही केस आणि निरोगी आरोग्यासाठी प्या. आवळ्याचा रस प्यायल्याने केसांचा पोत सुधारतो.
आवळ्याचा रस टाळूतील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो तसेच केसांची नवीन वाढ होण्यास मदत होते.
आवळ्याच्या रसातील लोह आणि प्रथिने केसांची मुळे मजबूत करतात यामुळे केस तुटणे, टाळूवरचा कोरडा कमी करते.
आवळा रसातील शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मेलॅनिनच्या निर्मितीसाठी मदत करतात ज्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.