Surabhi Jayashree Jagdish
साडी कितीही महाग किंवा सुंदर असली तरी निऱ्या नीट बसल्या नाहीत तर संपूर्ण लूक बिघडतो. अनेक महिलांना साडी नेसताना त्यांच्या निऱ्या सरळ, एकसारख्या येत नाही. अशात काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर घरच्या घरीही परफेक्ट निऱ्या सहज येऊ शकतात.
साडी आधी कंबरेवर नीट बसवली तर निऱ्या आपोआप सरळ पडतात. खूप वर किंवा खूप खाली साडी नेसल्यास निऱ्या विस्कटतात. त्यामुळे उभं राहून आरशात उंची तपासून मग निऱ्या घालायला सुरुवात करा.
प्रत्येक निऱ्यांचा आकार एकसारखी ठेवा. त्यामध्ये फार जाड किंवा फार पातळ नको. साधारण तीन ते चार बोटांच्या रुंदीच्या निऱ्या सुंदर दिसतात. हाताने सरळ दाब देत घडी घातल्यास निऱ्या छान राहतात.
निऱ्या घातल्यानंतर त्या कंबरेजवळ घट्ट दाबा. एक सेफ्टी पिन आतल्या बाजूने लावा. पिन नीट लावल्यास निऱ्या चालताना उघडत नाहीत.
निऱ्या खाली सोडण्याआधी हलक्या खेचून सरळ करा. यामुळे निऱ्या पायांवर नीट येतात. विशेषतः सिल्क आणि कॉटन साड्यांसाठी ही ट्रिक उपयुक्त ठरते.
साडी नीट इस्त्री केलेली असेल तर निऱ्या आपोआप नीट बसतात. सुरकुतलेली साडी निऱ्यांचा आकार बिघडवते. नेसण्याआधी फक्त निऱ्यांचा भागही इस्त्री करू शकता.
ब्लाऊज आणि पेटीकोट घट्ट फिट असणं खूप महत्त्वाचं आहे. सैल पेटीकोटमुळे निऱ्या खाली सरकतात. योग्य फिटमुळे निऱ्या जागेवर स्थिर राहतात.