Manasvi Choudhary
वाढते वजन आणि लठ्ठपणा अत्यंत त्रासदायक समस्या बनली आहे. शरीरावर अतिरिक्त चरबी साठल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
वजन कमी करण्यासाठी अनेक जण जिम ला जातात हजारो पैसे खर्च करतात. मात्र तुम्हाला माहितीये का डेली रूटीनमध्ये तुम्ही काही खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केला तर तुम्हाला वजन कमी झाल्याचा फरक दिसून येईल.
सकाळी नाश्त्याला तेलकट पराठे किंवा मैद्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. त्याऐवजी कमी तेलात बनवलेले पोहे किंवा रव्याची इडली खा.
सकाळी दूध-साखरेचा चहा पिण्याऐवजी नाश्ता केल्यानंतर १ तासाने ग्रीन टी पिण्याची सवय लावा.
जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा काहीही तेलकट खाण्यापेक्षा ४-५ बदाम खा. बदामामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे भूक नियंत्रणात राहते
मेथीचे दाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. १ चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी गाळून प्या.
सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी १ ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.