मांजर आडवी गेली तर, रस्ता क्रॉस करावा की नाही?

Manasvi Choudhary

अंधश्रद्धा

आजही अनेकजण मानत असलेल्या अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे 'मांजर रस्ता ओलांडणे'. अनेकजण रस्त्यावर चालत असताना मांजर आडवी गेली, तर काही वेळ थांबतात किंवा रस्ता बदलतात.

Cat Crossing Path Myth

प्रेमानंद महाराजांचा सल्ला

मात्र, सुप्रसिद्ध संत श्री प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सकारात्मक विचार करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, मांजर रस्त्यावर आडवी गेली तर अशुभ नसते.

Premanand Maharaj Pravachan

मानवी मनाच्या कल्पना

प्रेमानंद महाराज सांगतात की, तुमच्या वाटेत मांजर आडवी गेली किंवा तुम्ही बाहेर पडताना कोणी शिंकले, तर त्याने तुमच्या कामात काहीही फरक पडत नाही. या सर्व केवळ मानवी मनाच्या कल्पना आणि भ्रम आहेत.

Cat Crossing Path Myth

देवाची भक्ती करा

महाराजांच्या मते, जगातील सर्वात मोठी आणि खरी शक्ती देवाच्या नामाचे स्मरण करण्यात आहे. जर एखादी व्यक्ती देवाचे नाव घेऊन, त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून घराबाहेर पडली, तर जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा अपशकुन तिला स्पर्शही करू शकत नाही.

Cat Crossing Path Myth

सकारात्मक विचार

महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे की, "जर तुमच्या रस्त्यातून १०० ते २०० मांजरी जरी आडव्या गेल्या, तरी तुमचे काहीही वाईट घडणार नाही." त्यामुळे अशा निरर्थक गोष्टींमुळे मनात भीती बाळगणे पूर्णपणे चुकीचे आहे.

Cat Crossing Path Myth

उपाय

जेव्हा तुमचा विचार सकारात्मक असतो आणि देवावर विश्वास असतो, तेव्हा कोणतीही वाईट शक्ती किंवा परिस्थिती तुमची प्रगती रोखू शकत नाही.

Cat Crossing Path Myth

महत्वाची टिप

प्रेमानंद महाराजांचा हा सल्ला अशा लोकांसाठी आहे जे नकारात्मक विचार करतात. येथे दिलेली माहिती ही पूर्णपणे खरी किंवा अचूक असल्याचा आमचा दावा नाही. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Vrindavan Premanand Ji

NEXT: 'या' देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे कोंबडा

येथे क्लिक करा....