ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सरपंच निर्मला नवले या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.
निर्मला नवले या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरपंच आहेत.
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरंपचपदी निर्मला नवले यांची निवड झाली आहे.
कारेगाव मतदारसंघात त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्यात आली. या गावाला तरुण सरपंच मिळाल्या आहेत.
वयाच्या २७ व्या वर्षी निर्मला या सरपंच झाल्या आहेत.
निर्मला यांनी B.E इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
निर्मला नवले यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
महिला सबलीकरण आणि ग्रामीण भागात विकास करायचा हे त्यांचे उद्दिष्ट आहे.