Siddhi Hande
गणेशोत्सव सुरु झाला आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे.सेलिब्रिटींपासून ते नेतेमंडळींच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध सरपंच निर्मला नवले यांच्या घरीदेखील गणरायाचे आगमन झालं आहे.
निर्मला नवले यांच्या कारेगावच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर गणपती बाप्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
निर्मला यांनी पती शुभम नवले यांच्यासोबत गणपती बाप्पाची पूजा केली.
निर्मला यांनी छान निळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर मराठमोळी साजश्रृंगार केला आहे.
निर्मला यांनी मोठ्या भक्तीभावाने गणेशाची सेवा केली आहे. याचसोबत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
निर्मला यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. त्या नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.