Shreya Maskar
वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी पाणी, लिंबू, सब्जा , मध इत्यादी साहित्य लागते. तुम्ही या घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून हे हेल्दी ड्रिंक बनवता येते.
वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम कोमट पाणी करून घ्या. त्यात लिंबू पिळा. लिंबू छोटे आणि कोवळे घ्या.
त्यानंतर यात सब्जा, मध घालून मिश्रण एकजीव करा. २०-२५ मिनिटे तसेच पाण्यात भिजवून ठेवा. जेणेकरून सब्जा चांगला फुलेल.
तयार केलेले वेट लॉस ड्रिंक नियमित सकाळी रिकाम्या पोटी प्या. या पाण्याच्या सेवनाने पोटाची अतिरिक्त चरबी कमी होईल.
सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असते. जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
सब्जामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. तसेच फायबरचे प्रमाण यामध्ये अधिक असते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
लिंबू हे पचण्यासाठी हलके असून मेटाबॉलिजम सुधारण्यास मदत करते. तसेच लिंबू तुम्हाला मिनिटांत फ्रेश करते.
लिंबू हे मधासोबत मिक्स केल्यास त्वरीत शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते. लिंबू वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.