Surabhi Jayashree Jagdish
हाय बीपी ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. ज्याला अनेकदा सायलेंट किलर असं म्हटलं जातं. या आजाराची लक्षणे सुरुवातीला स्पष्ट दिसत नाहीत त्यामुळे अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
हाय बीपीला सायलेंट किलर म्हटलं जातं कारण याची लक्षणं सहज लक्षात येत नाहीत. अशावेळी शरीर आतून नुकसान सहन करत असतं. पण बाहेरून काही जाणवत नाही.
अनेक वेळा हाय बीपीची काही ठराविक लक्षणं रात्री अधिक जाणवतात. शरीर विश्रांतीत असताना हे बदल स्पष्ट दिसू शकतात. त्यामुळे रात्री होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते.
जर रात्री विशेषतः डोक्याच्या मागच्या भागात तीव्र वेदना जाणवत असतील, तर ते हाय बीपीचे संकेत असू शकतात. ही वेदना सतत किंवा अचानक वाढू शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
झोपताना किंवा आडवं झाल्यावर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे गंभीर लक्षण असू शकते. अचानक श्वास लागणं किंवा छातीत जडपणा जाणवणं दुर्लक्षित करू नका. हे उच्च रक्तदाबाशी संबंधित असू शकतं.
रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागणं. हा त्रास केवळ सामान्य नसून हाय बीपीशी संबंधित असू शकतो. त्यामुळे हा बदल जाणवल्यास डॉक्टरांशी चर्चा करणं गरजेचं आहे.
रात्री छातीत जकडण, दडपण किंवा वेदना जाणवणं हे धोक्याचे संकेत आहेत. हे हृदयावर वाढलेल्या ताणाचं लक्षण असू शकतं. अशा वेळी उशीर न करता वैद्यकीय मदत घ्यावी.