Shreya Maskar
रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी फक्त १० मिनिटे हलके चालण्याची सवय लावली, तर आरोग्यासाठी ती फायदेशीर ठरू शकते.
जेवणानंतर हलके चालल्याने शरीराची हालचाल होते, परिणामी अन्न पचनास मदत मिळते. पोट फुगणे, ॲसिडीटी, गॅस होणे, पोट जड वाटणे किंवा अस्वस्थता जाणवणे या समस्या उद्भवत नाही.
जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यानंतर हलके चालल्याने स्नायू ग्लुकोजचा वापर करतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी वाढ कमी करण्यास मदत मिळते.
जेवल्यानंतर चालल्याने कॅलरी खर्च होतात. संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांसोबत चालले तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
जेवणानंतर चालल्याने हृदय-रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते. जेवणानंतर १० मिनिटे चालल्याने दिवसभरातील शारीरिक हालचाल वाढते.
जेवणानंतर शांतपणे चालताना दिवसभराच्या कामातून थोडा विरंगुळा मिळतो. मोकळ्या हवेत चालणे, संथ श्वास घेणे आणि मोबाइलपासून दूर राहणे यामुळे मन प्रसन्न राहते.
जेवणानंतर सुरुवातीला संथ गतीने चालावे. जेवल्यानंतर लगेच वेगाने धावणे टाळा. रोज थोडी थोडी मिनिटे वाढवा, जेणेकरून शरिराला त्याची सवय होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.