Sakshi Sunil Jadhav
रात्री झोपेत अनेकांना तहान लागते. मग झोपेतून उठून ते पाणी पितात.
तहान लागणं ही एक सामान्य समस्या असली तरी त्याने गंभीर आजार उद्भवू शकतात.
रात्री तहान लागणे याला नॉक्टुरिया म्हणतात.
पुढे आपण रात्री झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या होवू शकतात जाणून घेऊयात.
ज्यांच्या रक्तातली साखर वाढलेली असते त्यांना ही समस्या जाणवते.
झोपेतून उठून पाणी प्यायल्याने डायबिटीज मेलिटस ही समस्या उद्भवू शकते.
जेव्हा किडनी शरीरातले पाणी बॅलेन्स करू शकत नाही. त्यांना डायबिटीज इन्सिपिडस ही समस्या उद्भवू शकते.
जेव्हा किडनी डिजीज होते तेव्हा वारंवार तहान लागण्याची समस्या वाढते.
स्लीप ॲप्रिया आजारामध्ये श्वास घेणं थांबू शकतं. त्याने वारंवार जाग येते.