Night Dinner: रात्रीच्या जेवणात हे ७ पदार्थ खाताय? त्यामुळेच वाढत असेल तुमचं वजन

Shruti Vilas Kadam

बिर्याणी

बिर्याणीमध्ये तूप, तेल आणि मसाल्यांचा भरपूर वापर केला जातो. त्यामुळे ती कॅलरीयुक्त असते आणि वारंवार रात्री खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Black rice meal

बटर पनीर किंवा पनीर बटर मसाला

पनीर पौष्टिक असले तरी क्रीम, बटर आणि काजूच्या ग्रेव्हीमुळे हा पदार्थ जास्त फॅट आणि कॅलरीयुक्त होतो.

Paneer Butter Masala Recipe | Social Media

पराठे

तूप किंवा तेलात भाजलेले पराठे रात्री पचायला जड ठरू शकतात. वारंवार सेवन केल्यास अतिरिक्त कॅलरी शरीरात साठतात.

paratha

पुरी-भाजी

तळलेल्या पुरी आणि बटाट्याच्या भाजीचे संयोजन कार्बोहायड्रेट आणि फॅटने भरलेले असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास हा पर्याय मर्यादित प्रमाणात घ्यावा.

Puri | yandex

फ्राईड राईस किंवा इंडो-चायनीज पदार्थ

जास्त तेल, सॉस आणि सोडियममुळे फ्राईड राईस किंवा नूडल्ससारखे पदार्थ रात्री खाल्ल्यास कॅलरीचे प्रमाण वाढते.

Veg Fried Rice Recipe

डाळ तडका (जास्त तेलातील)

डाळ आरोग्यदायी असली तरी रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडक्यात भरपूर तूप आणि तेल वापरले जाते. त्यामुळे तिच्या कॅलरी वाढतात.

Dal Tadka Recipe | yandex

जेवणानंतर मिठाई

गुलाबजाम, हलवा, खीर किंवा इतर गोड पदार्थांमध्ये साखर आणि तूप भरपूर असते. रोज रात्री जेवणानंतर मिठाई खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो.

मिठाई | Yandex

Dnyanada Ramtirthkar: हिरवी साडी अन् नाकात नथ; 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम ज्ञानदा रामतीर्थकरचं खुललं सौंदर्य

Dnyanada Ramtirthkar
येथे क्लिक करा