Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Shreya Maskar

देवगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तळवडे गावाजवळ न्हावणकोंड धबधबा आहे. पावसाळ्यात तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करा. देवगड कोकणची शान आहे.

Devgad | google

न्हावणकोंड धबधबा

न्हावणकोंड धबधबा हे कोकणातील हिडन लोकेशन आहे. जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, दाट हिरवळीसाठी आणि स्वच्छ, सुरक्षित पाण्यासाठी ओळखले जाते.

Nhawankond Falls | google

कधी भेट द्यावी?

न्हावणकोंड धबधब्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट द्या. पावसाळ्यात येथे तुम्हाला धुक्याची चादर पाहायला मिळेल. तसेच इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा पाहून वेडे व्हाल.

When to visit? | google

देवगड बीच- किल्ला

न्हावणकोंड धबधब्याजवळ देवगड बीच आणि देवगड किल्ला आहे. देवगड बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Devgad Beach- Fort | google

नापणे धबधबा

जवळच असलेल्या वैभववाडी भागात नापणे धबधबा आहे. हा धबधबा त्यावर बांधलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या 'ग्लास ब्रिज'साठी (काचेच्या पुलासाठी) प्रसिद्ध आहे.

waterfall | google

विजयदुर्ग किल्ला

न्हावणकोंड धबधब्यापासून सुमारे ५५ किमी अंतरावर विजयदुर्ग किल्ला वसलेला आहे. हा भव्य ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. मराठा साम्राज्याने बांधलेला हा किल्ला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे.

Vijaydurg Fort | google

कुणकेश्वर मंदिर

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे प्राचीन आणि अत्यंत श्रद्धास्थान असलेले शिवमंदिर सुमारे २५ किमी अंतरावर आहे.

Kunkeshwar temple | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Panvel Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...