Manasvi Choudhary
नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरू आहे. नवीन वर्षात नवीन संकल्प घेऊन आपण वर्षाची सुरूवात करतो.
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घराची स्वच्छता करणे महत्वाचे आहे. वास्तुशास्स्तानुसार नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातील काही अशुभ किंवा अनावश्यक वस्तू बाहेर काढणे महत्वाचे असते.
वास्तूशास्त्रानुसार, बंद पडलेले घड्याळ प्रगती थांबवण्याचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्या घरात भिंतीवर किंवा कपाटात बंद घड्याळे असतील, तर ती एकतर दुरुस्त करा किंवा घरातून बाहेर काढा
तडा गेलेले कप, प्लेट्स किंवा फुटलेला आरसा घरात ठेवणे अशुभ मानले जाते.
कपाटात वर्षानुवर्षे न वापरलेले आणि फाटलेले कपडे साठवून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ते तुम्ही घरातून बाहेर काढा.
घरातील कुंड्यांमध्ये जर झाडे वाळली असतील, तर ती काढून टाका. वाळलेली झाडे नैराश्याचे प्रतीक मानली जातात. नवीन वर्षात घरात हिरवीगार नवीन झाडे लावा
बंद पडलेले मोबाईल, चार्जर, खराब झालेले रिमोट घरातून बाहेर काढा