ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवीन वर्ष आता जवळ आले आहे आणि या काळात अनेकांना सुट्ट्या असतात. म्हणूनच, नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ते आपल्या कुटुंबासोबत फिरायला जायचा प्लॅन करतात. तर जाणून घ्या ७ ठिकाणांबद्दल जेथे तुम्हाला नवीन वर्ष साजरे करता येईल.
नवीन वर्षाच्या संध्याकाळी मनाली मधील सर्व कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये डीजे पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तसेच नवीन वर्षाकरिता नवनवीन गोष्टींचे आयोजन केलेले असते.
नवीन वर्षाच्या संध्याकाळी, राजस्थानच्या भागातील लोक वाळवंट सफारी, तंबूच्या घरांमध्ये राहून, तेथील लोकनृत्याचा आणि कॅम्पिंगसारख्या उपक्रमांचा आनंद घेता येतो.
हे ठिकाण तरुणांचे खूप लोकप्रिय आहे आणि येथे नवीन वर्षाच्या पार्ट्या मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात.
ज्या लोकांना शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिला आवडते अश्या लोकांनी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी ऊटीला जावे.
येथील प्रत्येक एक घर तुम्हाला आकर्षित करणारे आहे. तसेच पुडेच्चरी मधील बीचवर छान पार्टीज केल्या जातात.
नवीन वर्षा दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गोव्यातील प्रत्येक एक बीच पार्टीसाठी सजलेले असतात.
तलावाकाठच्या कॅफेमध्ये म्युझिक ऐकत आणि खाण्याचा आस्वाद घेत नवीन वर्ष नैनीतालमध्ये साजरे करणे हा एक खरोखरच अनोखा अनुभव आहे.