Priya More
देशातील जनतेने नववर्षाचे म्हणजे २०२५ चे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटमध्ये केले.
नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित करण्यात आल्या होत्या. या पार्ट्यांमध्ये दारूचा समावेश होता.
भारतात काही राज्य असे आहेत ज्यांनी नववर्षाच्या स्वागतादरम्यान दारू विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले.
कर्नाटक राज्याचा दारू विक्रीचा आकडा ३०८ कोटींवर पोहचला आहे.
तेलंगणा राज्यामध्ये एका दिवसांत तब्बल ४०१ कोटींची दारू विकली.
केरळ राज्याने नववर्षाच्या स्वागतादरम्यान १०८ कोटींची दारू विकली.
उत्तराखंड राज्यात दारू विक्री करून उत्पादन शुल्क विभागाला १४.२७ कोटींचा महसूल प्राप्त झाला.
उत्तर प्रदेशने तर दारू विक्रीचा नवा विक्रम केला. तब्बल ६०० कोटींची दारू विकली.
दिल्लीमध्ये तर ४०० कोटी रुपयांची दारू विकली गेली.