Shreya Maskar
नवीन वर्षाची सुरुवात हेल्दी जेवणाने करा.
डाळ पुलाव करण्यासाठी तुरीची डाळ, बासमती तांदूळ, तूप, हिंग, जिरे, मीठ, लाल मिरच्या आणि गरम पाणी इत्यादी साहित्य लागते.
डाळ पुलाव करण्यासाठी सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवा.
आता कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरे, हिंग आणि लाल मिरचीची फोडणी द्या.
या मिश्रणात डाळ आणि तांदूळ घालून चांगले परतून घ्यावेत.
आता या मिश्रणात गरम पाणी टाकून 3- 4 शिट्या करून घ्या.
कुकर थंड झाल्यावर भातावर साजूक तूप घाला.
तयार झालेला डाळ पुलावचा दहीसोबत आस्वाद घ्या.