Shreya Maskar
गाजर हलवा बनवण्यासाठी गाजर, बटर, दूध, साखर, खवा, वेलची पावडर, दुधाची साय आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
गाजर हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर धुवून साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
तुम्ही गाजर हलवा न किसता झटपट कुकरमध्ये तयार करू शकता.
आता कुकरमध्ये बटर घालून गाजरचे तुकडे शिजवून घ्या.
गाजर शिजल्यावर त्यात दूध टाकून पुन्हा ३ ते ४ शिट्ट्या काढून घ्या.
आता एका पॅनमध्ये दूध आणि गाजर मिक्स करून घ्या. त्यात थोडी दुधाची साय देखील घाला.
दूध संपूर्ण आटल्यावर त्यात साखर आणि खवा घाला.
शेवटी यात तूप, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालून छान हलवा परता. अशाप्रकारे सिंपल पद्धतीने गाजर हलवा तयार झाला.