Shreya Maskar
कुकीज बनवण्यासाठी मैदा, बेकिंग पावडर, मीठ, लोणी, साखर, अंड, व्हॅनिला इसेन्स, बदाम इत्यादी साहित्य लागते.
आयसिंग करण्यासाठी पिठीसाखर, दूध, व्हॅनिला इसेन्स आणि फुड कलर इत्यादी साहित्य लागते.
ख्रिसमस स्पेशल कुकीज बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ मिक्स करा.
दुसऱ्या बाऊलमध्ये लोणी, साखर , व्हॅनिला इसेन्स आणि बदामाचा इसेन्स घालून छान एकत्र करा.
आता हे मिश्रण बेकींग ट्रेवर गोल दोन लेअरमध्ये छोट्या कुकीजमध्ये पसरवा.
आता हे कुकीज १०-१५ मिनिटे बेक करा.
आता एका बाऊलमध्ये पिठी साखर, दूध, फूड कलर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र फेटून आयसिंग क्रीम बनवा.
तुमचे स्वादिष्ट कुकीज तयार झाले. तुम्ही वेगवेगळ्या कुकीज मोल्डचाही वापर करू शकता.