Shreya Maskar
मटर पनीर बनवण्यासाठी पनीर, मटर, फ्रेश क्रीम, टोमॅटो, आले पेस्ट, गरम मसाला, खडे मसाले, कोथिंबीर, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
मटर पनीर बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे तुकडे करून गोल्डन फ्राय खरपूस तळून घ्या.
टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक मिक्सरला वाटून घ्या.
आता पॅनमध्ये मटार टाकून शिजवून घ्या.
ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून त्यात खडे मसाले टाका. सोबत आले पेस्ट आणि गरम मसाला देखील घाला.
या मसाल्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून ग्रेव्ही परतून घ्या.
तयार झालेल्या मसाल्यामध्ये क्रीम घालून मिक्स करा.
शेवटी ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ , तळलेले पनीर आणि मटार मिसळून एक उकळी काढून घ्या. ढाबा स्टाइल मटर पनीर भाजी तयार झाली.