Shraddha Thik
तुम्ही हिवाळ्यात पर्यटन किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल, पण कुठे जायचे हे ठरवता येत नसेल.
IRCTC ने याचा विचार करत त्यांच्या वेबसाईटवर काही टूर पॅकेजेसची माहिती दिली आहे. IRCTC साइट https://www.irctctourism.com/ ला भेट देऊन तुम्ही तुमचे आवडते ठिकाण बुक करू शकता.
IRCTC ने सध्या विकेंड पॅकेजेस आणले आहेत. हे टूर पॅकेज पाहा
IRCTC चे सर्वात स्वस्त टूर पॅकेज विशाखापट्टणम-सिम्हाचलमसाठी 4555 रुपये आहे.
तर देशातील सर्वात महाग टूर पॅकेज रॉयल राजस्थानचे 47000 रुपयांचे आहे.
या पॅकेजमध्ये रेल्वे आणि विमान प्रवास, पर्यटनस्थळांसाठी स्थानिक वाहतूक, नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक आणि इन्शुरंस यांचा समावेश आहे.
IRCTC च्या या वीकेंड पॅकेजमध्ये धार्मिक, पर्वत, वाळवंट, समुद्र किनारपट्टीचा समावेश आहे.