Shruti Vilas Kadam
सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नीना गुप्ता, अली फजल, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि फातिमा सना शेख यांचा 'मेट्रो... इन दिनो' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही.
'कराटे किड - लेजेंड्स' हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याला भारतात फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
'सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज' हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद महान काश्मिरी गायिका राज बेगमची भूमिका साकारत आहे. तर, आलिया भट्टची आई सोनी राजदान देखील मुख्य भूमिकेत आहे.
'माय लाईफ विथ द वॉल्टर बॉईज'चा दुसरा सीझन आला आहे. दहा भागांचा हा सीझन एक हृदयस्पर्शी किशोरवयीन नाटक आहे. २८ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
'द थर्सडे मर्डर क्लब' ही चार लोकांची कथा आहे जे वर्षानुवर्षे काल्पनिक खूनांबद्दल विचार करतात आणि नंतर तो सोडवण्याचा प्रयत्न करतात. असे करताना ते स्वतःला खऱ्या खूनांमध्ये अडकवतात. ही सिरीज २८ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा 'परम सुंदरी' हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे