Surabhi Jayashree Jagdish
धनाची बरकत होण्याचा आजचा दिवस आहे. आलेला पैसा खर्चही करायला आज तुम्ही मागे पुढे पाहणार नाहीत.
मुळात रसिक असणारी आपली रास मनातील मनोदय अजूनच पूर्णत्वाला जाण्याचा दिवस आहे. दिवस आरोग्यदायी आहे.
नको त्या ठिकाणी खरे बोलणे आज टाळलेले बरे. आपल्या बोलण्यामुळे कटकटी निर्माण होतील.
व्यवसायामध्ये नव्याने सृजनशीलता येईल. नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील. दिवसाच्या शेवटी दिवस सार्थकी लागला आहे अशी भावना निर्माण होईल.
मिरवायला आवडते लोकांनी केलेले कौतुक आवडते या सर्व गोष्टी तुमच्या झोळीत आज सहज येणार आहेत. कामाच्या ठिकाणी चांगला लाभ होईल.
नोकरी व्यवसायामध्ये विशेष वृद्धी होण्याचा आजचा दिवस आहे. यशाची दालने आपल्यासाठी वाट पाहत आहेत डोळे उघडे ठेवून वाटचाल करा.
परिस्थितीशी दोन हात करावेच लागतील. एकटेपण असले तरी सावरून पुढे जावे लागेल. वामार्गातून पैसा संभवतो आहे.
धीरोदत्तपणा आज सीमा गाठेल. कोर्टाच्या कामामध्ये विशेष यश मिळेल. कोणत्याही गोष्टीला न डगमगता पुढे जाल.
पायाच्या दुखण्यापासून आज सावध राहावे लागेल. नको असलेल्या लोकांच्या पासून चार हात लांब रहा. आज आपल्या मनाचा कौल घ्या आणि पुढे जा.
शंकराची उपासना आज करावी. उत्तम फल मिळेल. क्रीडा आणि कला क्षेत्रात सुद्धा प्रगती होईल.
घरातील ज्येष्ठांचा आदर करा.जुन्या गोष्टी सोडून नव्याकडे पाऊलवाट करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मनोवंचित घटना घडतील.
बहिणीची विशेष माया आणि प्रेम आपल्यावर आज असेल. रेंगाळलेले पत्रव्यवहार मार्गी लागणार आहेत. तसेच जवळचे प्रवासही घडतील.