Sakshi Sunil Jadhav
MPSC च्या परिक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून Ekyc करणे अनिवार्य केले आहे.
शासन सेवेत पदभरतीसाठी उमेदवाराला वन टाईम रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
तसेच रजिस्ट्रेशन झाल्यावर काही महत्वाची माहिती नोंद करावी लागणार आहे.
तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्जाची नोंदणी करू शकता.
नोंदणी करताना उमेदवाराला आधार क्रमांक नोंदवणे अनिवार्य असणार आहे.
राज्य शासनाकडून उमेदवाराचे टप्प्यांवर प्रमाणीकरण करण्यासाठी Ekyc सेवांसाठी एमपीएससीला प्राधिकृत केले आहे.
ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल, आधार ऑफलाईन पेपर, नॉन आधार ऑफलाइन केवायसी या पद्धतीतून ओळख पडताळणी करावी लागणार आहे.
यामध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्याला मोबाईल, ईमेल उपलब्ध हा आधार कार्डाशी जोडलेला देणे अनिवार्य आहे.
येत्या १५ जुलै २०२५ पासून हा नविन नियम लागू करण्यात येणार आहे.