Manasvi Choudhary
नवजात बाळांच्या फोटोशूटचा सध्या नवीन ट्रेंड सुरू आहे यामध्ये पहिल्या महिन्यापासून ते वर्षाचा होईपर्यंत बाळाचे खास फोटोशूट केले जाते.
बाळाच्या आयुष्यात पहिल्या वर्षात सतत बदल होत असतात याच काही गोंडस आठवणी म्हणून हे फोटोशूट केले जाते.
बाळाच्या फोटोशूटसाठी नवनवीन आयडीया तुम्ही ट्राय करू शकता. घरच्या घरी करता येतील अशा सोप्या आयडीया आज आपण पाहूया.
तुम्ही चंद्राच्या आकाराच्या उशीवर बाळाला झोपवून फोटोशूट करू शकता त्याभोवती स्टार लावून सजावट करू शकता.
कापसाच्या ब्लॅकेंटमध्ये गुंडाळून तुम्ही बाळाचे छान असे फोटोशूट करू शकता. आजूबाजूला फुलांची सजावट करा
नवजात बाळाच्या फोटोशूटसाठी तुम्ही त्याला ससा करू शकता. सश्याच्या आकाराची टोपी घालून तुम्ही हे खास फोटोशूट करा. यासोबत तुम्ही गाजर गवत याने सजावट करा.
फळे किंवा भाज्या आजूबाजूला ठेवून तुम्ही छान सजावट करू शकता. हे देखील आकर्षक असेल.