AI Safety: AI वापरताना सावधगिरी बाळगा! 'या' गोष्टी कधीही शेअर करू नका, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका

Dhanshri Shintre

सावधगिरी

एआय वापरताना एकही निष्काळजीपणा तुम्हाला हॅकर्सच्या सहज लक्ष्यधारक बनवू शकतो; त्यामुळे मजबूत पासवर्ड, नियमित अपडेट्स आणि सावधगिरी नेहमी आवश्यक आहे.

अयोग्य कंटेंट

एआय चॅटबॉट्सवर कोणतेही अश्लील, आक्षेपार्ह किंवा अयोग्य कंटेंट शेअर करू नये, कारण त्याचा गैरवापर होऊन गंभीर परिणाम होऊ शकतात.

वैयक्तिक गोष्टी

एआयसोबत अशा वैयक्तिक किंवा संवेदनशील गोष्टी शेअर करू नका, ज्या भविष्यात सार्वजनिक झाल्यास तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात.

धोकादायक

चॅटबॉटवरून कायदेशीर सल्ला घेणे धोकादायक ठरू शकते, कारण दिलेली माहिती अचूक नसेल आणि चुकीचे निर्णय होऊ शकतात.

ओळखपत्र

पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र किंवा वैयक्तिक फोटो कधीही एआय सिस्टमवर शेअर करू नका; गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी जोखमीचे आणि गंभीर ठरते.

बॅक कागदपत्रे

बँक खाते, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तपशील आणि पासवर्ड कधीही एआयशी शेअर करू नका; आर्थिक सुरक्षिततेसाठी हा महत्वाचा नियम आहे.

वैयक्तिक माहिती

वैयक्तिक माहिती, आरोग्यविषयक रेकॉर्ड किंवा कंपनीचा गोपनीय डेटा एआय प्लॅटफॉर्मवर शेअर करणं धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे ते नक्कीच टाळावे.

डेटा

कंपनीचा संवेदनशील डेटा लीक झाल्यास व्यवसायाला मोठे आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेची हानी आणि ग्राहकांचा विश्वास गमावण्याचा धोका निर्माण होतो.

NEXT: Perplexity Pro AI सह एअरटेलचा बजेट-फ्रेंडली प्लॅन, मिळतील १७ हजार रुपयांचे फायदे

येथे क्लिक करा