Google search safety: गुगलवर कधीही सर्च करू नका 'या' 7 गोष्टी; पडू शकतं महागात

Surabhi Jayashree Jagdish

पासवर्ड किंवा लॉगिनची माहिती

तुमचा पासवर्ड गुगलवर सर्च करणे किंवा सर्चमध्ये टाइप करणं टाळा. अशा संवेदनशील माहितीचा गैरवापर झाल्यास तुमची ऑनलाइन खाती धोक्यात येऊ शकतात. पासवर्ड विसरल्यास गुगलवर शोधण्याऐवजी संबंधित वेबसाइट किंवा अॅपमधील अधिकृत ‘Forgot Password’ पर्यायाचा वापर करा.

things not to search on Google | saam tv

बँक खात्याची माहिती

बँक खाते क्रमांक, डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती, UPI PIN किंवा OTP यांसारखी माहिती तपशील गुगलवर कधीही शोधू नका. अशा माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात.

cyber fraud | saam tv

आजाराची लक्षणं आणि उपचार

गुगलवर आजाराची लक्षणं शोधून स्वतःच आजाराचं निदान करणं योग्य नाही. इंटरनेटवर मिळालेली माहिती सामान्य स्वरूपाची असू शकते आणि प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. औषधोपचार किंवा घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे.

internet safety | saam tv

मोफत सॉफ्टवेअर किंवा डाउनलोड लिंक

‘Free Download’ किंवा पायरेटेड सॉफ्टवेअरच्या अनोळखी लिंक गुगलवर शोधून डाउनलोड करणं टाळा. अशा वेबसाइटवर मालवेअर, व्हायरस किंवा इतर धोकादायक फाइल्स असण्याची शक्यता असते.

password security | saam tv

अनोळखी बँकिंग वेबसाइट

गुगल सर्चमध्ये दिसणारी प्रत्येक बँकिंग वेबसाइट अधिकृत असेलच असं नाही. बनावट वेबसाइटवर लॉगिन किंवा आर्थिक माहिती भरल्यास ती माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकते. बँकेच्या वेबसाइटवर जाण्यासाठी अधिकृत पत्ता स्वतः टाइप करणं किंवा अधिकृत अॅप वापरणं योग्य आहे.

online banking safety | saam tv

पर्सनल माहिती

अनोळखी गुगल लिंकवर नाव, मोबाइल नंबर, ई-मेल, आधार क्रमांक किंवा इतर वैयक्तिक माहिती भरू नका. आकर्षक ऑफर, बक्षीस किंवा तातडीच्या पडताळणीच्या नावाखाली अशा लिंकद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

OTP fraud | saam tv

कागदपत्रं आणि खासगी माहिती

आधार, पॅन, पासपोर्ट, ओळखपत्र किंवा इतर संवेदनशील कागदपत्रांची माहिती गुगल सर्चमध्ये टाकणं टाळा. अशी माहिती सार्वजनिक किंवा असुरक्षित ठिकाणी गेल्यास तिचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

PAN card safety | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil belly button | saam tv
येथे क्लिक करा