Dhanshri Shintre
अनेक लोकांना थंड झालेलं अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय लागलेली असते.
काही पदार्थ वारंवार गरम करून खाल्ले तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि तब्येत बिघडू शकते.
भात वारंवार गरम करून खाल्ल्यास पोटदुखी, गॅस, उलटी आणि फूड पॉइजनिंगसारख्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते.
पालकात नायट्रेट असल्यामुळे ते वारंवार गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे टाळावे.
मशरूम वारंवार गरम करून खाल्ल्यास पचनाशी संबंधित त्रास जसे पोटदुखी, गॅस आणि अस्वस्थता जाणवू शकते.
चिकन वारंवार गरम करून खाल्ल्यास पचनात अडथळे निर्माण होतात आणि पोट जड व भरलेले वाटू शकते, त्यामुळे टाळावे.
उकडलेली किंवा तळलेली अंडी पुन्हा गरम केल्यास त्यांचे पोषक तत्त्व कमी होतात, त्यामुळे ती वारंवार गरम करू नयेत.
बटाटा पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्यातील गुणधर्म बदलतात आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, त्यामुळे टाळावे.