साम टिव्ही ब्युरो
आध्या आनंद ही एक अभिनेत्री आहे.
ती युट्यूबवरील Dice Media Crushed या सीरीजमध्ये दिसल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली.
आध्या आनंदचा जन्म 2 नोव्हेंबर 2007 रोजी कूर्ग, कर्नाटक येथे झाला.
तिचे शालेय शिक्षण ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, मुंबई येथे झाले.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या तिने वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात केली.
एका मुलाखतीत आध्याने तिच्या अभिनयाच्या आवडीबद्दल सांगितले की, ''काहींना, अभिनय हे एखाद्या कामासारखे वाटते, परंतु माझ्यासाठी हा एक आनंदानुभव आहे.''
आध्याने वयाच्या 9 व्या वर्षी सिंगापूर चित्रपट 'एलो बर्ड' (2016) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
2021 मध्ये, तिने नेटफ्लिक्स सीरीज बॉम्बे बेगमद्वारे डिजिटल पदार्पण केले, ज्यामध्ये तिने शाईची मुख्य भूमिका साकारली होती.