ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्म्द सिराज सध्या बॅार्डर-गावस्कर ट्राफिमध्ये आपल्या वेगवान आणि घातक गोलंदाजीने सगळ्यांची मने जिंकत आहे.
आयपीएल ते थेट भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्म्द सिराजचं नेटवर्थ किती, जाणून घेऊया.
मीडिया वृत्तानुसार, मोहम्मद सिराजची २०२४ पर्यंतची संपूर्ण नेटवर्थ ७ मिलियन डॅालर्स म्हणजेच ५७ कोटी आहे.
बीसीसीआयचा वार्षिक करार, मॅच फिस, आयपीएल सॅलरी आणि जाहिराती हे सिराजच्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहे.
आयपीएल २०२३मध्ये रॅायल चॅलेंजर्स बंगळुरुने सिराजला ७ कोटी देत रिटेन केले होते.
२०२५च्या आयपीएल मेगा लिलावात गुजरात टायटन्सने १२.२५ कोटींची बोली लावत सिराजला आपल्या संघात घेतले. २०१७ ते २०२४ पर्यंत सिराजने आयपीएलमधून २७ कोटी कमावले आहे.
जाहिराती आणि आयपीएल वगळता सिराज महिन्याला ६० लाख रुपये कमावतो.
तसेच सिराजकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. गाबा टेस्टमध्ये दमदार प्रदर्शनानंतर आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा थार कार गिफ्ट केली होती.
NEXT: हिवाळ्यात केसांची अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय