Shreya Maskar
दगडांपासून बनवलेली शिल्पे, सुव्यवस्थित लॉन, मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आणि मिनी-ट्रेन असलेले हे एक शांत आणि सुंदर गार्डनर आहे.
जमिनीचा भराव घालून तयार केलेल्या तलावाभोवती वसलेले हे एक उत्कृष्ट वॉटरफ्रंट पार्क आहे. येथे वॉकिंग ट्रॅक, ओपन-एअर जिमची साधने देखील आहेत.
पाम बीच रोडवर सीवूड्स फ्लेमिंगो पॉइंट आहे. हा पाणथळ आणि चिखलाचा भाग आहे. हिवाळ्यात येथे हजारो स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी येतात. निसर्गप्रेमी कुटुंबांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
डोंगरावरून टप्प्याटप्प्याने खाली येणारा शिरवणे धबधबा पाहून तुमचे मन भारावून जाईल. पावसाळ्यात शहराच्या धावपळीतून काही काळ निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक जवळचे आणि छान ठिकाण आहे.
आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या शहरी उद्यानांपैकी एक म्हणजे खारघरचे सेंट्रल पार्क होय. येथे विस्तीर्ण बोटॅनिकल गार्डन, संगीतमय कारंजे, चालण्यासाठी मार्ग आणि क्रीडा मैदाने आहेत.
नेरूळजवळ खारघर येथे पांडवकडा धबधबा आहे. १०७ मीटरपेक्षा जास्त उंचीवरून निसर्गरम्य दरीत कोसळणारा हा एक भव्य धबधबा आहे. पावसाळ्यातील सहलीसाठी हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे.
सीबीडी बेलापूर येथे मँगो गार्डन आहे. आंब्याची अनेक झाडे, बदकांचा तलाव, घसरगुंड्या आणि मोकळ्या हवेत जेवणाचा आनंद घेण्यासाठी येथे नक्की जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.