Nashik Tourism : पावसाळ्यात भटकंतीसाठी बेस्ट! नाशिकमधील 'हे' ठिकाण प्रत्येक निसर्गप्रेमीने पाहावे

Shreya Maskar

नाशिक-त्र्यंबकेश्वर पर्वतरांग

नाशिक-त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत अंजनेरी डोंगररांग हे ठिकाण वसलेले आहे. पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर नाशिकपासून सुमारे २० किमी आणि त्र्यंबकेश्वरपासून ६ किमी अंतरावर आहे.

Nashik-Trimbakeshwar range | google

अंजनेरी डोंगररांग

अंजनेरी डोंगररांग हे ४,२६४ फूट उंची आहे. हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्ग प्रेमींसाठी बेस्ट आहे.

Anjaneri hill range | google

भगवान हनुमानाचे जन्मस्थान

हनुमानाची माता 'अंजनी माता' यांच्या नावावरून या डोंगरांला हे नाव पडले आहे. येथे अंजनी मातेची पवित्र गुहा आणि मंदिर आहे, जिथे त्यांनी हनुमानाला जन्म दिला असे मानले जाते.

Birthplace of Lord Hanuman | google

अंजनेरी किल्ला

पठाराच्या माथ्यावरअंजनेरी किल्ला वसलेला आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, जिथून वैतरणा जलाशयाचा (बॅकवॉटर) आणि शेजारील ब्रह्मगिरी शिखराचा विहंगम नजारा दिसतो.

Anjaneri Fort | google

खडकात कोरलेल्या लेण्या

या मार्गावर १२ व्या शतकातील खडकात कोरलेली १०८ प्राचीन पवित्र स्थळे आणि जैन लेण्या आहेत. शिल्पकलेचा येथे सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Rock-cut caves | google

ट्रेकिंग

पावसाळ्यातील निसर्गरम्य मार्ग, दाट हिरवीगार जंगले, कोसळणारे धबधबे आणि दगडांच्या पायऱ्यांतून जाणारी वाट पर्यटकांना आकर्षित करते. ट्रेकिंगचा येथे आनंद घ्या.

Trekking | google

कारवीची फुले

पावसाळ्यात डोंगराच्या उतारांवर गडद निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या कारवीच्या फुलांची चादर पसरलेली असते. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Caraway flowers | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Ambernath Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...